Marathi Ukhane : 300+ Ukhane in Marathi【January 2021】

नमस्कार तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर, आज  तुमच्या सोबत काही marathi ukhane शेयर करणार आहे, 

Marathi Ukhane : 300+ Ukhane in Marathi


 आशा करते की तुम्हाला हे Marathi ukhane नक्की आवडतील 


Marathi ukhane 


मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस…
__तू फक्त, मस्त गोड हास


Marathi ukhane navrdev हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे…
Marathi ukhane Male 


माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप…
__ ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप


Marathi ukhane for marriage 


__माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल…
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल


Marathi ukhane Navardev


__च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
__ला पाहून, पडली माझी विकेट !


Marathi Ukhane Navri 


प्रेमाच्या चौकात किती पण फिरा …
शोधून नाही सापडणार___सारखा हिरा

--#--


एका वर्षात, महिने असतात बारा…
__मुळे वाढलाय, आनंद सारा!

--#--


हे पण पाहा Marathi Suvichar

--#--


ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा
__मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा

--#--

गोऱ्या गोऱ्या गालावरती तीळ काळा काळा…
__च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा

--#--


लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त …
__आल्यापासून  झालंय, आयुष्य खूपच मस्त !

--#--


एक होती चिऊ आणि एक होता काऊ …
__ च नाव घेतो, डोकं नका खाऊ

--#--


निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे …
__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे

--#--आकाशाच्या पोटात चंद्र, सूर्य, तारांगणे …
__ च नाव घेतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे


--#--

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा …
__ च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!


--#--

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल…
__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल


--#--

नवे घर, नवे लोक, नवी नवी नाती..
संसार होईल मस्त, __राव असता सोबती


--#--


नव्या नव्या संसाराचा, नाजूक-गोड अनुभवही नवा…
__राव  व माझ्या संसाराला, तुमचा अखंड आशीर्वाद हवा

--#--

नव्या नव्या घरात, कोणीही जाईल गांगरून…
__चुकली कुठे तर, घ्या जरा सावरून

--#--

माझ्या गुणी __ला, पहा सगळ्यांनी निरखून…
जणू कोहिनूर हिरा, आणलाय आम्ही पारखून
--#--


सुखी संसाराची करतोय, आम्ही आता सुरुवात…
__ वर ठेवा कायम, तुमचा प्रेमळ मायेचा हात

--#--

नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून…
__रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून…
--#--

लाल लाल मेहेंदी, हिरवागार चुडा…
__ रावांमुळे पडला जीवनात, प्रेमाचा सडा
--#--

सासरचे निराजंन, माहेरची फुलवात…
__रावांचे नाव घेण्यास, करते मी सुरुवात
--#--


संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान…
__रावांच नाव घेते सर्वांचा राखून मान
--#--

नव्या नव्या आयुष्याची, नवी नवी गाणी…
__माझा राजा आणि मी त्याची राणी
--#--

Chavat Marathi Ukhane | Non veg Marathi Ukhane | adult Marathi Ukhane


--#--

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…
__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय
--#--

नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…
चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट
--#--

चांदीच्या ताटात __चे पेढे…
__माझे हुशार, बाकी सगळे वेडे!
--#--

चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…
__माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी
--#--

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…
__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा
--#--

बाजारातून घेऊन येतो __ ताजी ताजी…
__शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी
--#--

हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू …
___  एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू
--#--

गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू…
__चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.
--#--

__ची बाटली आणि काचेचे ग्लास …
__ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास
--#--

लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी…
त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी
--#--

गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू…
दिवसभर सुरु असते __ चे गुलूगुलू
--#--

गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…
__राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव!
--#--

हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ…
__रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ
--#--

बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड  गोड…
___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड
--#--

उखाणा घ्या म्हटलं की, उखाणा काही सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घेऊ, माझंच मला कळत नाही
--#--

Marathi Ukhane For Young Gernrations | Marathi Ukhane For New Peoples 

--#--ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
__तू मला, सुपरवूमन वाटतेस

--#--

पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला,
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?
--#--

_च्या बाईक वर __ दिसतो एकदम फिट,
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट
--#--

मंथ एन्ड आला की, Work  Load ने जीव होतो हैराण…
__सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण
--#--

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून
--#--

मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम …
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी __ कटकट करते जाम
--#--

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली…
__ आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली
--#--

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा …
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?
--#--

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त…
_च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त
--#--

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग …
__ माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग
--#--

मिळून काम केल्यावर कामं होतात लवकर…
मी चिरते भाजी आणि __ लावतो कुकर
--#--

माझ्या __ चा चेहरा आहे खूपच हसरा …
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा
--#--

तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल…
__ माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल!
--#--

इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ…
माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ

--#--

दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते…
_च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते

Marathi Ukhane on Village


गार गार माठामधले पाणी ताजे ताजे…
__राव माझ्या मनाचे झाले राजे

--#--


काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार…
__ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार

--#--


इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून …
__रावांचं  नाव घेते __ ची सून

--#--

कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी …
आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी

--#--


मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे…
__ च नाव घेते, तोंड आठवून __चे!

--#--


Marathi Ukhane for Old citizens 


--#--


औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी …
__रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी

--#--


माझ्या सुंदर हास्यामागे __चाच हात…
__चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात

--#--

__मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु…
हसत खेळत आम्ही आता __टूर करू

--#--

आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो…
तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो

--#--


केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी…
माझ्या संसारवेलीचे __राव माळी

--#--


बघता बघता __ सोबत __वर्षे लोटली…
रोज बघतो स्वप्नात, सकाळी __भेटली

--#--


हसत खेळत संसाराची, वर्षे सहज लोटणार…
__सोबत मी वयाची, शंभरी गाठणार

--#--


म्हातारपणी काठी बनली, माझी साथीदार…
__मुळे मिळाला माझ्या, जीवनाला आधार

--#--

__ च्या गोळ्या घेऊन, तोंड होते कडू…
__इतकी गोड जणू, मऊ बेसनाचा लाडू

--#--

वय झालं, टक्कल पडलं, पोटही सुटलं …
__वरचं प्रेम, तरी अजिबात नाही आटलं
--#--

उखाणे घेता घेता, सरली __वर्ष …
__रावांना भेटल्याचा, मनी खूपच हर्ष !
--#--

बघता बघता संसाराची __ वर्ष सरली…
__च्या साथीने माझी, आनंदवेल बहरली
--#--

वयामुळे थकले अंग , तरीही मन ताजे…
__माझी राणी आणि आम्ही तिचे राजे

--#--

नाते जुने झाले तरी, रंग अजूनही ताजाच आहे…
__सोबत असताना, प्रत्येक दिवस मजाच आहे
--#--


प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी …
__ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी

--#--

लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू 
...रावांना घास देताना,मला येई गोड हसू . 

--#--

सौभाग्याचे लेणे पायात जोडवी, 
हातात चुडा ,कपाळी टिळा ,कंठी काळी पोत 
--रावांच्या जीवनात सदा तेवो मांगल्याची ज्योत. 

--#--

 वाडयात वाडा चॊसोपि वाडा वाडयाला अंगण ,अंगणात वृंदावन , वृंदावनात तुळस, 
तुळशीला रोज घालते पाणी __रावांची मी आहे राणी. 

--#--

भल्या पहाटे करावी देवाची पुजा , 
...च्या जीवावर करते मी मजा.

--#--

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, ... माझी बायको आहे मोठी लुच्ची.

--#--

चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.


Funny Marathi Ukhane 


सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून, ...... रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून.

--#--

 थोरातांच्या दुधावर येते जाड साय, 
...... ना जन्म देणरी धन्य ती माय.

--#--

जीवन आहे एक अनमोल ठेवा, 
...... आणतात नेहमी सुकामेवा.

--#--

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक, 
.... आहेत आमचे फार नाजुक.

--#--

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड 
...... हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड.

--#--

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा, 
...... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा. 

--#--

चांदीच्या ताटात मुठभर गहू 
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

--#--

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक, 
...... आहेत आमचे फार नाजुक. 

--#--कपाळावर लावले कूंकू लाल लाल, 
...... च्या जीवावर आहे मालीमाल.

--#--

सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड 
...... चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड. 
--#--

 पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका, ...... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का.

--#--

तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल 
...... ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.

--#--

वड्यात वडा बटाटावडा, 
...... मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

--#--

आकाशात चकाकतात तारे, 
समुद्रात झळकतात मोती, 
...... नी बनवलंय मला सौभाग्यवती. 

--#--हिरव्या-हिरव्या कुरणी , 
चरत होती हरणी 
...... चे नाव घेते सासुबाई च्या चरणी. 

--#--कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर, 
कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर, 
...... रावांनी शालू आणला नवा-न कोर. 

--#--


 बनारसी शालूला आहेत जरतारी काठ, 
...... च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट. 

--#--


...... चा नि माझा संसार होईल सुकर, 
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर. 

--#--


बारसं Ukhane in Marathi  | मराठी बारशाचे उखाणे

 हिरवं लिंबू गारसं, 
...... रावांच्या बाळाचं आज बारसं.

--#--


हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, 
...... चं नाव घेते ...... च्या बारशाच्या दिवशी.

--#--


शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी, 
...... चं नाव घेते बारशाच्या दिवशी.

--#--


आई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी, 
...... चे नाव घेते बारशाच्या दिवशी.

--#--


नीलवर्ण आकाशात चमकतो शशी, 
...... चं नाव घेते ...... च्या बारशाच्या दिवशी.

--#--


दशरथ राजानं केला पुत्रासाठी नवस आज 
...... च्या मुलाच्या बारशाचा दिवस. 

--#--चान्दिच्या ताटात फणसाचे गरे, 
...... राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे. 

--#--एक होती चिऊ एक होती काऊ, 
...... रावांच नाव घेते , डोक नका खाऊ.

--#--


नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद, 
...... तर आहेत माझ्या डाव्या खिशात.

--#--


 झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु, 
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु. 

--#--


फुलाला असावा सुगंध स्त्रीला असावा सदगुण ...... राव हेच माझे आभूषण.


--#--

                         

Marathi Ukhane

 Marathi Ukhane

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Ukhane in Marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Ukhane 

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi
 ukhane in marathi
Marathi Ukhane || Ukhane in marathi
 funny marathi ukhane
Marathi Ukhane || Ukhane in marathi
 ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi
  
marathi ukhane

Marathi Ukhane || Ukhane in marathi

ukhane in marathi

Marathi Ukhane || Ukhane in marathi


आशा करतो की तुम्हाला हे मराठी उखाणे ( Marathi Ukhane )आवडले असतील, आवडले तर नक्की शेयर करा 

Read Also 

Post a Comment (0)
Previous Post Next Post

Telegram Group Link