20+ Best Marathi Kavita 2020 Collection

namskar मित्रानो तुमच स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर आज में तुमच्या सोबत कही Marathi Kavita शेयर करनार आहे आणि आशा करतो की तुम्हाला या  कविता नक्की  आवडतील 

******************************************************

Marathi Kavita On Jivan 

कणाकणांचे मिलन असे, मायेच्या त्या गर्भी;
जीवन अशी ही पदवी, ज्यासी मिळते प्रारंभी !!
उभारलेल्या वाटेवरती, मग सुरू होते ती खेळी;
अन् इवल्याशा त्या पावलांवर, पडते कर्तृत्वाची झोळी !!
एक एक त्या कर्तृत्वाची, मग सुरू होते मोजणी;
अन् अविरत पसरणाऱ्या विचार वृक्षास, बसते कायमची टोचणी !!
मोहक अशी मग आयुष्याची, स्वप्ने सारी पडू लागतात;
अन् जबाबदारीच्या त्या वळणांवर, बोलके काटे मात्र रुतु लागतात !!
मध्यांतरात त्या जीवनाच्या, कोडी भविष्याची पडू लागतात;
अन जीवनपुष्पाच्या स्वच्छंदी पाकळ्या, एकाकी मग झडू लागतात !!
प्रवास साऱ्या आठवणींचा, जीवनोत्तरी मग होऊ लागतो;
अन् विस्कटलेल्या त्या जीवनाचा, खरा गुन्हेगार उलगडू लागतो !!
***************************************************************

Marathi Love Kavita 

तुझ्याशिवाय आयुष्य खरंच खूप छान होत,
माझं एकट्याच स्वच्छंदी असं राहणं होतं.....

नातेवाईक ट्रिप, ट्रेक आणि मित्र,
इतकं साधं होतं माझ्या जीवनाचं सूत्र.....

एक दिवस तुला बघितलं आणि प्रेमाची घंटी वाजली,
त्यानंतर काय विचारा, माझी प्रेम कहाणी किती गाजली.....

तू आयुष्यात आल्यावर सगळच अचानक बदललं,
माझा विश्व आता तुझ्याभोवती फिरू लागलं.....

पूर्वीच्या गर्दीत आता तुझ्याशिवाय उगाचच एकाकी असतो मी.....
पण तुझ्याबरोबरच्या एकांतात तुझीच लाखो रूपे बघतो मी.....

आज तू आहेस, मी आहे आणि आहे हा मधहोष एकांत,
आज तोडूया सगळे बंध, होऊ दे ती हुरहूर शांत.....

मग माझच मन सांगत की, खरी मजा बंधनात आहे,
वाहत जातात ओहळ देखील, पण स्थिरता सागराच्या स्पंदनात आहे.....

आता आयुष्याला तुझ्यामुळेच अर्थ आहे, तू नसलीस तर जीवन काय,
मृत्यू देखील व्यर्थ आहे.....
***************************************************

Marathi Life Kavita 


थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला
पणती जपून ठेवा  अंधार फार झाला

आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला

काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला

हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला

वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला

हे  वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला

शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला
**************************************************************************************************

Marathi Sad Love Kavita 


तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
श्वासाच्या अधरावरती
मन झोका घेत होता

तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या विरहात
मन हेलकावत होता

तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
अंधाराच्या त्या झगमग तारा
झुळूक घालती मृगजळ वारा

तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
आकाशाच्या मृदगंध सारा
झुळझुळ वाहे ओढा ओला

तू गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
प्रेमाच्या त्या प्रतिकासाठी
मन भावनाविष होता..
********************************************************************************************

Marathi Sad Love Kavita 

हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..

प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
... माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..

डोळ्यांतुन ओघळलेला थेंब
माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
बस..हात तुझा हाती होता..

तो रुसलेला ओला रुमाल..
पाऊले मागे फिरताना हसला होता
बस..हात तुझा हाती होता..

क्षणांत वाढणारे अंतर पण..
श्वासांत तुझाच दर्प होता
बस..हात तुझा हाती होता..


प्राण नेण्या मृत्यु चुकला होता..
वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता
बस..हात तुझा हाती होता..
*******************************************************************************************************

Marathi Love Kavita

भांडण म्हणजे काय असते रे
तुझं माझं प्रेम असते रे
रुसवा फुगवा काय असतो रे
तुझ्या माझ्यातला बालिशपणा असतो रे
एकमेकांना मनवण म्हणजे काय असते रे
तुझ्या माझ्यातली निरागसता असते रे
शेवटी काय तू आणि मी म्हणजे काय रे
एकच न ...एकच न...
***********************************************************************************

Marathi Kavita on respect womens


विषय- स्री म्हणजे खेळणं नव्हे

खेळत आईच्या मांडीवर
वाढले मी लाडात राणी
लागले चालू दुडुदुडु अंगणी
तेव्हा झाले होते मी खेळणं
फक्त माझ्याच आईबाबांसाठी....

टाकले पाऊल समाजात सहजच
दिसत होते बाहुलीसारखी छान
वाटलं नव्हतं खरंच खेळणं बनेन
शंका मनातली सत्यात ऊतरली
संतापाची लकेर मस्तकात घुसली

सांगावे वाटले ओरडून जगाला
अरे!! स्त्री म्हणजे खेळणं नव्हे
आहेत तिलाही भावना अन्..
आहे सुंदर हळवं मनसुद्धा
विचार करा रे त्याचाही तुम्ही
बंद करा तुमच्या वासनांध नजरा..


नाही व्हायचं मला खेळणं कुणाचं
शिकायचयं प्रतिकार करायला ...
अकारण होणाऱ्या अन्यायाविरुद्ध
मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरुद्ध.
बनवायचयं सक्षम मला करण्या
उद्धार स्वतःचाच..
पाडण्या मुडदे अत्याचाऱ्यांचे

जागे व्हा षंढानो , या सामना करायला. वारसा आमचा झाँसीचा अन् पराक्रमी अहिल्येचा
जिजाऊ अन् सावित्री च्या त्यागाचा.नारीशक्ती उठली पेटून तर खैर तुमची नसे या जगी.
***********************************************************************

Marathi Kavita shivaji maharaj

रयतेचा राजा थोर
शिवराय छत्रपती
आदर्शांचा परिपाक
सुप्रसिध्द राजनिती।

चेतविला स्वाभिमान
धन्य माऊली ती जीजा
वीर रक्त प्रकटते
धन्य पिता शहाजी राजा।

कावा तो गनिमी
धुव्वा शत्रूचा रणी
धाडसाचे बाळकडू
जणू वाघ रणांगणी।

शूर वीर घडविले
ध्येय स्वराज्य पुजिले
निर्णायक,धुरंधर
तत्व अंगी बाणियले।

स्वराज्याच्या प्रतिज्ञेला
देवालय स्वयंभूचे
रक्त तिलक करुनी
मागे दान स्वराज्याचे।

शायिस्त्या, अफजलाचा काळ
धुळीस मिळवला गनिम
औरंगजेबाला दिली मात
इच्छाशक्ती धुर्त अदिम।

गडकिल्ले मजबूत
स्वराज्याचे ते रक्षक
शिवबांनी वर्धित केले
भक्कम तट संरक्षक।

माता भगिनींचा बंधू
रयतेचा दैवी त्राता
दातृत्व जगती प्रसिध्द
मावळ्यांचा पालनकर्ता।

असा राजा पुन्हा होणे
शक्य नाही इतिहासात
लाखो,देशवासियांच्या
शिवराय वसले मनामनात
*****************************************************************************